पुणे – राज्यात गेल्या 24 तासांत 16 हजार 620 बाधितांची नोंद झाली असून, 50 बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या वाढत असल्याने आणि बरे होण्याचे प्रमाणही कमी असल्याने “रिकव्हरी रेट’ 92.21 टक्के झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 1 कोटी 75 लाख 16 हजार 885 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली असून, त्यामधील 23 लाख 14 हजार 413 जण बाधित आढळले आहेत. त्यातील 21 लाख 34 हजार 72 रुग्ण बरे झाले असून, 1 लाख 26 हजार 231 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.
तसेच पाच लाख 83 हजार 713 रुग्ण होम क्वारंटाइन आहेत; तर 5 हजार 493 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. पुणे जिल्ह्यातील ऍक्टीव्ह रुग्णसंख्या दुप्पट झाली असून, ती 25 हजार 673 आहे; तर 16 हजार 964 ऍक्टीव्ह रुग्ण नागपुरात आहेत. मुंबई (12 हजार 535) ठाण्यानंतर ( 12 हजार 332), नाशिक (7 हजार 688) आणि औरंगाबाद (7 हजार 148) मध्ये सर्वाधिक ऍक्टीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात 28 लाख 19 हजार 888 लाभार्थ्यांना लस…
राज्यात आजपर्यंत 28 लाख 19 हजार 888 लाभार्थ्यांना लस देण्यात आली असून, त्यामध्ये 9 लाख 21 हजार 755 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे तर 1 लाख 71 हजार 494 लाभार्थी को-मॉर्बिड आहेत. रविवारी 1 लाख 29 हजार 966 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यातील 1 लाख 23 हजार 150 जणांना कोविशिल्ड तर 6 हजार 816 जणांना कोवॅक्सीन देण्यात आली.