पुणे – देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हवेचे प्रदूषणात सातत्याने घट होत आहे. पर्यावरण अभ्यासकांनी नुकत्याच घेतलेल्या नोंदीनुसार, शहरी भागातील हवेचे प्रदूषण 16.49 टक्क्यांनी कमी झाले आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या 47 दिवसांहून अधिक काळापासून शहरातील अनेक उद्योग आणि वाहतूक बंद आहेत. तसेच विजेचा वापर देखील बराच कमी झाला आहे. याचा सकारात्मक परिणाम हवेच्या प्रदूषणावर झाला आहे. एप्रिलमध्ये हे प्रमाण 6.8 टक्के कमी होते. मुंबईतील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यू अट युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो (एपिक) या संस्थेने लॉकडाऊन काळात हवेतील प्रदूषण परिस्थितीचा अभ्यास कारण्यासाठी विशेष पोर्टल विकसित केले आहे. यातून ही माहिती समोर आली आहे.
उद्योग आणि वाहनांमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामध्ये घट होऊन परिणामी पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) या हानिकारक घटकाचे प्रमाण कमी झाल्याने हवेचे प्रदूषण कमी झाल्याची नोंद या अभ्यासात घेण्यात आली आहे.