वार्री (नायजेरिया), – दक्षिण-नायजेरियातील तुरूंगाच्या इमारतींवर जोरदार सशस्त्र बंदूकधाऱ्यांनी हल्ला चढविला आणि त्यातील 1,500 पेक्षा अधिक कैद्यांची सुटका केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. पोलीस आणि लष्कराच्या तुकड्यांचे संरक्षण असलेल्या या तुरुंगावर हा घातक हल्ला करण्यात आला होता. इमो राज्यातील ओव्हरी गावात पहाटे दोनच्या सुमारास हा हल्ला सुरू झाला आणि सुमारे दोन तास ही धुमश्चक्री सुरू होती, असे स्थानिक रहिवासी उचे ओकाफोर यांनी सांगितले. त्याच वेळी बंदूकधाऱ्यांनी इतर अनेक सरकारी इमारतींवर हल्ला केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोनच आठवड्यांपूर्वी सशस्त्र हल्लेखोरांनी नैऋत्येकडील भागातही अशाच प्रकारचा हल्ला केला होता. चार पोलिस स्टेशन, लष्करी चौक्या आणि तुरूंगातील वाहनांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये किमान डझनभर सुरक्षा अधिकारी शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतली नाही. मात्र इस्टर्न सिक्युरिटी नेटवर्क नावाच्या प्रदेशात सक्रिय असलेल्या अलगाववादी चळवळीच्या निमलष्करी दलाला नायजेरियाच्या पोलिस महानिरीक्षकांनी जबाबदार धरले आहे.
रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यामध्ये मशिन गन, रॉकेट ग्रेनेड लॉंचर अणि आयईडी स्फोटकांचा सर्रास वापर केला गेला. या हल्ल्याला पोलिसांकडून योग्य प्रत्युत्तर दिले गेले, असे पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे. ईस्टर्न सिक्युरिइटी नेटवर्कने हा संघर्ष इग्बो नागरिकांचे विदेशी घुसखोरांपासून संरक्षण करण्यासाठी सुरू केला असल्याचे म्हटले आहे.