बारामती – जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील ६ दुकाने सात दिवसांसाठी सीलबंद करण्यात आले आहेत. तहसीलदार विजय पाटील यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी किरणराज यादव व पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी ही कारवाई केली.
शहरातील इंदापूर चौकातील राजहंस वाईन्स, भिगवन रोड वरील अजिंक्य बिग बाजार, निरा रोड वरील के मार्ट किराणा बाजार मॉल, तसेच धुपरे भेळ, भारत बेकरी, नोबल वॉच व मोबाईल शॉपी या सहा दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. पाच पेक्षा जास्त ग्राहक आढळून आले.
त्यामुळे दुकाने सात दिवस सीलबंद करण्यात आली आहेत. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.