ब्रिटनमध्ये आता जलद मोफत करोना चाचणी

लक्षणे नसणारे रूग्ण शोधण्यासाठी उपाय

लंडन – करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी ब्रिटन सरकारने नवी योजना आखली आहे. करोना लक्षणविरहित रुग्णांना शोधण्यासाठी ब्रिटनमध्ये आठवड्यातून दोन वेळेस चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवड्यातील शुक्रवारपासून सर्व नागरिकांना जलद करोनाचाचणी (रॅपिड कोव्हिड टेस्ट) होणार आहे. ही चाचणी मोफत असणार आहे.

उद्योग, दुकाने, रेस्टॉरंट यांना लॉकडाउनच्या नियमांतून शिथिलता देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने हे पाऊल उचलले आहे. ब्रिटनमधील नागरिकांपैकी कुणालाही ही जलद करोनाचाचणी मोफत करणे शक्‍य होणार आहे. 

आठवड्यातून दोनदा ही सुविधा असेल. करोना विषाणूमधील बदल शास्त्रज्ञांना शोधणे यामुळे शक्‍य होणार आहे; तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या चाचण्यांमुळे विषाणूंमध्ये उत्पपरिवर्तन नेमके कसे होते, हे शोधण्यासही त्यामुळे मदत होणार आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, ब्रिटिश नागरिकांनी करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. लसीकरण मोहिमेमध्ये आमची प्रगती असून, निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. 

याच्याच बरोबरीने अधिकाधिक करोनाचाचण्या होणे हेदेखील महत्त्वाचे असून, विषाणूविरोधातील लढा त्यामुळे अधिक तीव्र होईल. त्यामुळेच ब्रिटनमध्ये सर्वांना जलद करोनाचाचणी करण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. साथ आटोक्‍यात येण्यास त्यामुळे मदत होईल, असेही त्यांनी म्हटले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.