मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या लग्नाचा आज 14 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी फेसबुकवर हटके अंदाजात पोस्ट करत आपल्या पत्नीला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोल्हे यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की, ’14 वर्षांच्या वनवासाचं फलित काय असतं ते माहीत नाही पण 14 वर्षांच्या सहवासाचं फलित नक्कीच चांगलं आहे.. माणूस म्हणून समृद्ध होणं, संसाराच्या परिघात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणं, परस्परपूरक भूमिका घेणं या प्रत्येक गोष्टीत आणखी सुधारणा होत असताना..दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले आहेत… ताटकळत…१) “तू चूक” आणि २) “मीच बरोबर”….कारण तेवढं केलं की सहवासाबरोबरच विरहाच्याही प्रत्येक क्षणाचा सोहळा होतो.. समाधानाच्या उंबरठ्याच्या आत सुख नांदतं यावरचा विश्वास दृढ करणाऱ्या सहचारिणीस लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!’, असे कोल्हे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी अश्विनी कोल्हे यादेखील डॉक्टर आहेत. त्या 2009पासून मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत आहेत.