पुणे – बिबवेवाडी परिसरात आठवीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीवर कोयत्याने सपासप वार करुन खून करण्यात आला. त्याने तीच्या मानेवर एका मागून एक वार केले. तीचे मुंडके धडावेगळे करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबत इतर दोन साथीदारही होते. मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली होती.
क्षितीजा अनंत व्यवहारे(14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ती कब्बडीपट्टू होती. ती सायंकाळी यश लॉन परिसरात मैत्रिणींसोबत कब्बडीचा सराव करत होती. त्या वेळी तेथे आलेल्या एका तरुणाने तीला बाजूला घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.
यादरम्यान आरोपीने सोबत आणलेल्या कोयत्याने क्षितिजाच्या गळ्यावर सपासप वार केले. अत्यंत भीषम पध्दतीने त्याने तीचा खून केला. त्याच्यासोबत आलेल्या दोघांनीही त्याला साथ दिली. यानंतर त्याने घटनास्थळी कोयता टाकून पळ काढला. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-घटनेच्या आधीच गस्त घालणारी पोलिसांची गाडी तेथून गेली-
परिसरात लहान मुलांचे कब्बडी व इतर खेळांचे क्लास चालतात. तसेच नागरिक सायंकाळच्या वेळेस तेथे फिरावयास येतात. घटनेच्या काही मिनीटे अगोदरच पोलिसांची गस्त घालणारी गाडी तेथून निघून गेली होती. लहान मुलांसमोरच हा निर्घुन खून करण्यात आला.
यामुळे तेथील मुलांना व फिरावयास येणाऱ्या नागरिकांना मोठा धक्का बसला होता. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी घटनास्थळी भेट देउन तपासाच्या सूचना दिल्या. बिबवेवाडी पोलीस स्टेशन आणी गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर आहेत.
आरोपी शुभम भागवत हा मुलीच्या नात्यातील आहे. त्याला मुलीच्या घरच्यांशी दिड दोन वर्षापुर्वी समज दिली होती. दरम्यान क्षितीजा आज तीच्या पाच मैत्रिणींसोबत कब्बडीची प्रॅक्टीस करत होती. शुभमने तीथे दोघा मित्रांसोबत आला. यानंतर त्याने कोयता व चाकूने तीच्या मानेवर वार केले. घटना घडली तेव्हा तीच्या मैत्रीणी सोबत होत्या. थोड्याच अंतरावर काही घरे आहेत. मात्र तीला काहीच मदत मिळू शकली नाही. घटनास्थळी पिस्तूलही मिळाली असून ती तीला धमकावण्यासाठी आणल्याची शक्यता आहे- नम्रता पाटील (पोलीस उपायुक्त)