नवी दिल्ली – स्वातंत्र्य दिन 2021 निमित्ताने एकूण 1,380 पोलिसांचा पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे. एकूण 628 शौर्य पुरस्कारांपैकी, 01 पीपीएमजी जम्मू आणि कश्मीर पोलिस तसेच 01 पीपीएमजी सीआरपीएफ (मरणोत्तर) देण्यात आले.
जम्मू काश्मीरमधील शौर्यासाठी 398 पोलिसांना सन्मानित करण्यात आले. नक्षलग्रस्त भागातील शौर्यासाठी 155 पोलिसांना गौरवण्यात आले आणि इशान्येतील भागात शौर्य गाजवल्याबद्दल 27 पोलिसांचा सन्मान करण्यात आला.
शौर्य पुरस्कारांपैकी 256 जम्मू आणि कश्मीर पोलिस, 151 सीआरपीएफ, 23 आयटीबीपी, 67 ओदिशा पोलिस, 20 छत्तीसगड पोलिस तर उर्वरीत इतर राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेश तसेच सीएपीएफमधील पोलीसांना पुरस्कार मिळाले आहेत.
महाराष्ट्रातल्या 25 पोलिसांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर अतुलनीय सेवेसाठी महाराष्ट्रातील 43 पोलिसांना प्रतिष्ठेच्या राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले.