कोपरगाव – संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कोलगेट पालमोलिव्ह इंडिया प्रा. लि. मुंबई या कंपनीने संजीवनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत तेरा विद्यार्थ्यांना वार्षिक आठ लाख देवु करून नोकरीसाठी निवड केली.अंतिम निकालाच्या अगोदरच निवड झालेले विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.
कोल्हे पुढे म्हणाले की, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट विविध नामांकित कंपन्यांशी संपर्क साधुन त्या कंपन्यांना कोणते ज्ञान असलेले अभियंते पाहीजे याचा अभ्यास करते. प्रत्येक विभागामार्फत तशी तयारी करून घेतल्या जाते. तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग मुलाखतीचे तंत्र, भाषा प्रभुत्व, देहबोली, हजर जबाबीपणा, आदरयुक्त संभाषण, अशा अनेक बाबींचे रूजवण विद्यार्थ्यांमध्ये करते. यामुळेच संजीवनीच्या सर्व व्यावसायिक संस्था विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या देण्यासाठी आघाडीवर आहे.
कोलगेट पालमोलिव्ह या कंपनीने निशा सानप, लतिकाबेन नागपुरे, साक्षी कथले, शुभांगी लुनगडे, ऋतुजा मोरे, संस्कृती सोनार, आकाश कर्पे, चेतन खंडेलवाल, अर्पिता गमे, नंदिनी गुजराथी, शीतल काळे, सय्यम गंगवाल व प्रज्वल देशपांडे यांची निवड केली आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले अभियंते व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. अमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा छोटेखानी सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ.व्ही. एम. तिडके, विभागप्रमुख डॉ. डी. बी. क्षीरसागर, डॉ. एम. ए. जावळे व डॉ. डी. बी. परदेशी उपस्थित होते.
“कॉलेजमध्ये पायथन प्रोग्रामिंग व एसक्युएल डेटाबेस या संगणकीय भाषांचा सखोल अभ्यास शिकविण्यात आला. तसेच मला सुचविण्यात आलेल्या इंटर्नशिपचाही खुप फायदा झाला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आमच्याकडून खुप तयारी करून घेतली होती. त्यामुळे नोकरीसाठी निवड झाली. संजीवनीमुळे माझे व माझ्या पालकांचे स्वप्न पुर्ण झाले,” असे निशा सानप या विद्यार्थिनीने सांगितले.