भोर, (प्रतिनिधी) – भोर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात रविवारी (दि. ३) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १२६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. भोरच्या सहदिवाणी न्यायाधीश दीप्ती सरनायक यांच्या हस्ते लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ५१ लाख ४८ हजार ९४२ रुपयांची वसुली झाली. यामध्ये प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश आहे.
लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या २ हजार ६५० प्रलंबित प्रकरणांपैकी ८३ प्रकरणे निकाली काढून ३५ लाख ९३ हजार ६०० रुपयांची वसुली झाली, तसेच अदालतीमध्ये ठेवलेल्या २ हजार ३७ दाखल पूर्व प्रकरणांपैकी ४३ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १५ लाख ३७ हजार ९४२ इतक्या रकमेची वसुली झाली.
अशा एकूण ४,६८७ प्रकरणापैकी १२६ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन एकूण ५१ लाख ४८हजार ९४२ रुपयांची वसुली करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मुख्य पॅनल न्यायाधीश म्हणून सहदिवाणी न्यायाधीश दीप्ती सरनायक यांनी काम पाहिले, तर ॲड. धनश्री सुर्वे व ॲड. अनिता कांबळे यांनी पॅनल सदस्य म्हणून कामकाज पाहिले.
सदर लोकअदालतीसाठी भोर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मयुर धुमाळ, उपाध्यक्ष ॲड. बाळासाहेब गोगावले, सचिव ॲड. राकेश काेंडे, ॲड. दत्तात्रय उरणकर, ॲड. विश्वनाथ रोमण, ॲड. पृथ्वीराज चव्हाण, ॲड. राजेंद्र खोपडे, अॅड. विकास किंद्रे, ॲड राजेशकुमार बारटक्के,ॲड.
नारायण चव्हाण, ॲड. संजय कोचळे, ॲड. रघुनाथ चिव्हे, ॲड. विक्रम घाेणे, ॲड. अजिंक्य लाड, ॲड. धीरज चव्हाण, ॲड. धीरज कांबळे, ॲड. साहिल मुकादम, ॲड. राजश्री बाेरगे, ॲड. मनिषा तारु व इतर सर्व वकील सदस्य उपस्थित होते. तसेच दिवाणी न्यायालयातील कर्मचारी वर्ग, पोलिस कर्मचारी, बॅंक, पतसंस्था यांचे अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामपंचायतींचे ग्रामअधिकारी उपस्थित होते.