लोणावळा, (प्रतिनिधी) – लोणावळा शहरात मागील काही दिवसांत वेगवेगळ्या पक्षात सुरू झालेली राजकीय पडझड आज देखील सुरू राहिली असून काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक, लोणावळा शहर काँग्रेस निरीक्षक आणि प्रदेश प्रतिनिधी नासिर (पप्पूभाई) शेख यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षांना ‘मी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे.’ असा व्हाट्सॲप मेसेज करून नासिर शेख यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १३७ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. ४) शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी या पदाधिकाऱ्यांसोबत नासिर शेख होते.
येत्या गुरुवारी (दि. ७) शरद पवार यांच्या लोणावळा दौरा आहे. या वेळी त्यांचा शरदचंद्र पवार गटात निश्चित मानण्यात येते असून त्यांना शहराच्या संघटनेत महत्त्वाचे पद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.