माहिती आहे? कर्नाटकात आकाराला येतंय अंतराळवीर प्रशिक्षण केंद्र

473 एकर जमिनीवर तयार होईल अंतराळ उड्डाण केंद्र

कर्नाटकात बंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चित्रदुर्ग जिल्ह्यातील चल्लाकेरे जवळील उल्लारथी गावात भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण केंद्राचे काम पुढील 2 वर्षांत पूर्ण होईल. यात अंतराळवीरांसाठी प्रशिक्षणाची सोय असेल. या केंद्रात त्या सर्व सुविधा असतील ज्यासाठी अंतराळ प्रवासासाठी निवडण्यात आलेल्यांना रशियातील रॉसकॉसमोस पाठवले जाते. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की, गगनयानासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी कोट्यवधी खर्चून पाठवावे लागत आहे.

आतापर्यंत नासा अमेरिका, ईएयू, रॉसकॉसमोस रशिया, जर्मनी, सुकुबा अंतराळ केंद्र जपान आणि चायनीज नॅशनल स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन चीन येथे अंतराळवीरांना प्रशिक्षित करणे व अंतराळात पाठवण्याची सुविधा आहे.

मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाशी संबंधित इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांत सुरू असलेले उपक्रम व सुविधा उपलब्ध केल्या जातील. अंतराळ यानाचे क्रू व सर्व्हिस मॉड्यूलपर्यंत अंतराळवीरांचे प्रशिक्षण व मोहीम नियंत्रण केंद्रही असेल. गगनयान एकच मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम नसेल तर भविष्यात अंतराळवीराला अंतराळात पाठवण्याचा कार्यक्रम सुरू राहील.

सध्या गगनयानला अंतराळात घेऊन जाणार्‍या जीएसएलव्ही मार्क- 3 रॉकेटवर तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात, गगनयानच्या क्रू व सर्व्हिस मॉड्यूलवर बंगळुरूतील यू. आर. राव सॅटेलाइट सेंटरमध्ये व अंतराळवीरांची निवड व प्राथमिक प्रशिक्षणाचे काम एअरफोर्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसनमध्ये सुरू आहे.

473 एकर जमिनीवर तयार होईल अंतराळ उड्डाण केंद्र. ते तयार झाल्यानंतर आपल्या अंतराळवीरांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवण्याची गरज नसेल. हवेत तरंगत काम, खानपान-प्रातर्विधीचे प्रशिक्षण अंतराळ यानाचे क्रू, सर्व्हिस मॉड्यूलपासून अंतराळवीरांचे प्रशिक्षण व मोहीम नियंत्रण याच केंद्रातून होईल. येथे क्रू मॉड्यूल सिमुलेटर आणि मायक्रोग्रॅव्हिटी वातावरणासाठी व्हॅक्युम चेंबर, पॅराबोलिक फ्लाइट, न्यूट्रल बायेन्सीची सुविधा असेल. या सुविधांद्वारे अंतराळ-वीराला शून्य गुरुत्वाकर्षणात हवेत तरंगत वजनविरहित जाणीव करत काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

सध्या गगनयानसाठी निवडलेल्या अंतराळवीरांना रशियातील रॉसकॉसमोस येथे प्रशिक्षणाला पाठवले जात आहे. एक अंतराळवीराचे प्रशिक्षण विदेशात करण्यावर 25-30 कोटी रुपये खर्च येतो. हे केंद्र झाल्यावर हे काम देशातच होऊ शकेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.