मनसेचीही खांदेपालट शहराध्यक्षपदी गटनेते वसंत मोरे

पुणे – महापालिका निवडणुका अवघ्या वर्षभरावर आलेल्या असतानाच शिवसेनेपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील शहराच्या कार्यकारणीत फेरबदल केले आहेत. पक्षाचे पालिकेतील गटनेते वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपदही देण्यात आले आहे. तर, विद्यमान शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका पक्षाकडून शहरात मोरे यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्षाच्या संघटनात्मक बांधणी तसेच आगामी महापालिकेच्या निवडणुकांसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही आठवड्यांपूर्वीच पुण्यात बैठक घेतली होती. त्यात पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत पक्ष संघटनेत काही फेरबदलाचे संकेत दिले होते.

त्यानंतर बुधवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले होते. तेथे या नियुक्‍त्यांची घोषणा करण्यात आली. वसंत मोरे हे मनसेचा शहरातील आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. 2017 च्या निवडणुकीत पालिकेत मनसेचे 2 नगरसेवक निवडून आले होते. त्यातही वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघे नगरसेवक कायम वेगवेगळे आंदोलने करत चर्चेत असतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.