रांजणी -कळंब (ता. आंबेगाव) येथे युको बॅंकेसमोर हरिभाऊ बाबूराव भालेराव (वय 58) यांना एका अनोळखी व्यक्तीने, नवीन 500 रुपयांच्या नोटा पाहिजे, असे सांगून बोलण्यामध्ये गुंतवून बारा हजार रुपये घेऊन पोबारा केला. बुधवारी (दि. 23) दुपारी हा प्रकार घडला.
भालेराव हे युको बॅंकेतून 85 हजार रुपये रक्कम घेऊन बाहेर पडले.
त्यावेळी त्यांना अनोळखी व्यक्तीने, पाहुणे, घरी पूजा आहे नवीन कोऱ्या नोटा पूजेसाठी पाहिजे. मी तुम्हाला फसवणार नाही, काळजी करू नका. तुमच्या नोटांच्या बदल्यात जुन्या नोटा देतो, असे सांगून हरिभाऊ यांच्या हातातील नोटांचे बंडल घेतले. बोलण्याच्या नादात गुंतवून त्याने बारा हजार रुपये रक्कम काढून घेऊन उर्वरित रक्कम हरिभाऊ यांच्याकडील पिशवीत टाकली व पोबारा केला.