सातारा (प्रतिनिधी) – कराडच्या दोन रुग्णालयातील दहा व फलटणच्या रुग्णालयातील दोन अशा 12 जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता 92 झाली आहे. बऱ्या झालेल्या तिघांना आज घरी सोडण्यात येणार आहे.
कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 2, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 8 अशा एकूण 12 जणांचा अहवाल करोना पाँझिटिव्ह (कोविड-19) आला आहे. यापैकी 11 जण करोनाबाधितांच्या निकट सहवासातील असून फलटण येथील करोना केअर सेंटरमधील एका महिला आरोग्य सेविकेचा यात समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
मृत्यू दोघांचा अहवाल निगेटिव्ह
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दि. 4 रोजी मृत्यु झालेल्या 2 सारीसदृष्य नागरिकांचे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने निगेटिव्ह आले असल्याचे कळविले आहे.
बाधित 3 रुग्ण कोरोना मुक्त आज घरी सोडणार
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणाऱ्या 3 करोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी आज रुग्णालयातून घरी सोडणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
116 जाणांचे अहवाल निगेटिव्ह
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 48 आणि कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 68 असे एकूण 116 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचेही बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहितीही डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.