पिंपरी, (प्रतिनिधी) – शेअर मार्केटच्या नावाखाली व्यावसायीकाची 12 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 5 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत महाळुंगे येथे घडली.
याप्रकरणी सिद्धेश्वर लिबाण्या फताटे (वय 38, रा. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून 8108407353, 7039549079 या मोबाइल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फताटे यांनी डीमॅटच्या शेअर मार्केट अप्लिकेशन डाऊनलोड केले होते. त्यातील खाते हे फिर्यादीने आरोपीला हे खाते चालवण्यास दिले.
त्य़ातून भरपूर नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली वेळोवेळी 12 लाख रुपये घेतले. मात्र त्यातून नफा न देतो आरोपीने फिर्यादीकडे अधीक रकमेची मागणी केली.
यावेळी फिर्यादी यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली असता आरोपींनी फोन घेणे बंद केले. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.