पुणे -टाटा कंपनीत सुपरवायझरची नोकरी लावण्याच्या आमिषाने दोघांनी एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याला 12 लाख 15 हजारांचा गंडा घातला. ही घटना जानेवारी ते मे 2020 या कालावधीत घडली. याप्रकरणी लक्ष्मण गवस (51, रा. गणेशनगर, धायरी) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
लक्ष्मण गवस यांनी पुन्हा नोकरीसाठी ऑनलाइन वेबसाईटवर अर्ज केला होता. त्यानुसार दोघांनी त्यांना संपर्क साधून ओळख वाढविली. त्यानंतर टाटा कंपनीत सुपरवायझरची नोकरी लावण्याच्या आमिषाने त्यांच्याकडून रक्कम स्वीकारली.
त्यानंतरही नोकरी न लावल्यामुळे फसवणूक झाल्याचे गवस यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नागरिकांनी भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी केले आहे.