पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे श्री बिरोबा नवरात्र उत्सवमध्ये दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जारकरवाडी गावांमध्ये बिरोबा नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. घटस्थापनेच्या दिवशी गावामधून बिरोबा महाराज मंदिरापर्यंत डफाच्या तालावर वाजतगाजत बिरोबा मंदिरात घटाची स्थापना करण्यात आली.
प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी बिरोबा महाराजांची पूजा व नंतर आरती व दररोज संध्याकाळी भजन काळुबाईची गाणी तसेच कलगी-तुऱ्याचा व बिरोबाच्या वाण व ओव्याचा दैनंदिन कार्यक्रम झाले. दसऱ्याच्या दिवशी पहाटे गंगेचे पाणी आणणे. त्यानंतर पाण्याची मिरवणूक काढून बिरोबा महाराजांना आंघोळ घालणे व दुपारी महाआरतीचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी बिरोबा भक्त गणपत मंचरे यांना आंघोळ घालणे व महिलांनी औक्षण करवून त्यांची डफावर मिरवणूक काढून त्यांच्या कमरेला बारा गाड्या बांधून ओढण्यात आल्या. त्यानंतर पुढील वर्षाचे भाकित सांगण्यात आले.
या प्रसंगी सरपंच रूपाली भोजणे, ग्रामविकास अधिकारी कचरदास भोजणे, डी. डी. भोजणे, अनिल लबडे, विलास लबडे, राघुनाना वनवे, आनंदा भोजने, उत्तम मंचरे, बाबाजी देवडे व बिरोबा भक्त उपस्थित होते. महाप्रसादाचे कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन सोसायटीचे सचिव नवनाथ मंचरे, रवींद्र भांड, गणपत भोजणे, मच्छिंद्र भांड, रोहिदास तागड, लहु भोसले, अविनाश पवार, सुरेश भोजणे यांनी केले. सूत्रसंचालन नवनाथ जारकड व पोपट आप्पा भोजने अविनाश तागड यांनी केले.