तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये पहिल्या दिवशी देविदास सावंत, मारुती केंजळे तर दुसऱ्या दिवशी हर्षवर्धन सुभाष कदम यांना घाटाचा राजा हा मान मिळविला. तर गावामधून सोमाभाऊ भेगडे यांच्या गाड्याचा गावाच्या गाड्यांमध्ये प्रथम क्रमांक आला.
घाटाचा राजा बहुमान मिळविणाऱ्या गाड्याना प्रत्येकी ३ हजार २०० रुपये बक्षीस दिले, १३ सेकंदामध्ये ५१ गाडे धावले त्यांना प्रत्येकी रोख १ हजार ९०० रुपये बक्षीस दिले. १४ सेकंदामध्ये ७७ गाडे धावले त्यांना प्रत्येकी ६०० रुपये बक्षीस दिले. १५ सेकंदामध्ये ३७ गाडे धावले. त्यांनाही ८०० रुपये बक्षीस दिले. या घाटात फळीफोडमध्ये महेंद्र वारिंगे, शिवाजी जांभूळकर, संतोष पिंगळे यांना बक्षिस मिळाले.
या स्पर्धेसाठी अध्यक्ष मिथुन काकडे, खजिनदार प्रणव दाभाडे, सरचिटणीस सुधीर सरोदे, प्रसिद्धी प्रमुख स्मितेश भेगडे, कार्याध्यक्ष स्वप्निल दाभाडे. उपाध्यक्ष गौरव परदेशी, सौरभ जाधव, सहखजिनदार अमर जगदाळे, रोहित करपे, विक्रम दाभाडे, बाळासाहेब भेगडे, चेतन भेगडे, सोमा भेगडे, अजिक्य सातकर आदींनी विशेष प्रयत्न केले.