सातारा | यंत्रणेच्या नाकावर टिच्चून पुसेगाव परिसरात बैलगाड्या धावल्या

पोलिसांना माहिती नाही की...; दर रविवारी भरतोय अड्डा

सातारा – सर्वसामान्यांना करोनामुळे लावलेल्या संचारबंदीने घरात कोंडून ठेवले असतानाच खटाव तालुक्‍यातील पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात रविवारी सर्जा राज्याच्या पाठीवर चाबकाचे फटके देत बाहेरगावावरून आलेल्या बैलगाडी मालकांनी विजयाचा गुलाल उधळल्याची घटना घडली.

याबाबत पुसेगाव पोलिसांसह कोणालाच माहिती नसल्याचे सांगण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असले तरी पुसेगाव पोलिसांच्या कार्यपध्दतीवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने करोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडाला.

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पुसेगाव शहरात आडवून पावत्या फाडल्या जात असताना बाहेर गावावरून जाणाऱ्या बैलांच्या गाड्या दिसल्या नाहीत का? खरच पोलिसांना हा प्रकार माहिती नाही की माहिती नसल्याचे नाटक तर केले जात नाही नसेल ना.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.