हिमकडा कोसळला, धौलीगंगा नदीला पूर; 150 बेपत्ता

चमोली (उत्तराखंड)- उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात नंदादेवी हिमकडा उर्जा प्रकल्पाजवळ कोसळल्याने धौली गंगा नदीला पूर आला आहे. तपोवन भागातील रैनी गावात ही दूर्घटना घडली. हा हीमकडा कोसळल्याने नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. त्यानंतर आजूबाजूची शेकडो घरे पाण्यात अक्षरश: वाहून गेली. षीगंगा प्रकल्पावर काम करणारे सुमारे दीडशे मजूर बेपत्ता आहेत.

बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, धौलीगंगा नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी तातडीने हलवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये, आवश्‍यक उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने गंगा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा आदेश दिला आहे. पाण्याच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, षीगंगा प्रकल्पावर काम करणारे 150 मजूरांना याचा थेट फटका बसला असण्याची भीती राज्य आपत्कालीन प्रतिसाद दलाचे उपमहानिरीक्षक रिदम अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.