अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याची सुरूवात 24 फेब्रुवारी 2020 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून होणार आहे. याप्रसंगी डोनाल्ड ट्रम्प तीन तासांसाठी गुजरातमध्ये येणार आहे.
जगातील सर्वात शक्तीशाली नेत्याच्या स्वागतासाठी गुजरातमध्ये जंग्गी तयारी सुरू आहे. गुजरात सरकारकडून अहमदाबादमध्ये ठिकठिकाणी दुरुस्तीचे कामे केली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या तीन तासांच्या गुजरात दौऱ्यासाठी तब्बल 100 कोटींचा खर्च करण्यात येत आहे.
ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पैशांची कोणतीही कमतरता भासू नये, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानतर अहमदाबाद नगर निगम आणि अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरण रस्ते दुरुस्तीच्या कामात जुंपेल आहेत.
यासाठी 80 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील काही खर्चाचा भार केंद्रीय सरकार उचलणार आहे. परंतु, खर्चातील मोठा भाग राज्याला भागवावा लागणार आहे.