वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा धाकटा मुलगा बॅरोन ट्रम्प याला करोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी व्हाइट हाउसच्या संकेतस्थळावर लिहीलेल्या एका ब्लॉगमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.
आपल्यमुळे आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे 14 वर्षीय बॅरोन ट्रम्पला संसर्ग झाल्याची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत, असे मेलानिया यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांचे निकटचे सहकारी होप हिक्स यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आगोदर निष्पन्न झाले होते. त्यानंतर मेलानिया आणि ट्रम्प या दोघांनाही करोनाच्या संसर्गाची सौम्य लक्षणे दिसली होती.
1 ऑक्टोबर रोजी या दोघांच्या संसर्गाची घोषणा स्वतः ट्रम्प यांनीच केली होती. ट्रम्प यांना चार दिवस लष्करी रुग्णालयात ठेवले गेले होते. उपचारानंतर आता हे दोघेही करोनामुक्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र बॅरोन ट्रम्प याला संसर्ग होण्याची आपली भीती खरी ठरली असल्याचे मेलानिया यांनी म्हटले आहे.