पिंपरी – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 टक्के जागांसाठी अद्याप ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. तथापि, विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी महापालिका शिक्षण विभागाने 10 मदत केंद्र जाहीर केले आहे.
“आरटीई’ कायद्यानुसार शहरातील 170 शाळांची नोंदणी झालेली आहे. या शाळांमध्ये एकूण 3 हजार 324 इतक्या जागा “आरटीई’ प्रवेशासाठी राखीव ठेवल्या आहेत. “आरटीई’ अंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी हिीीं:/र्/ीीींवशपीं.ारहरीरीहीींर.र्सीें.ळप या संकेतस्थळावर सुविधा दिलेली आहे.
“आरटीई’ प्रवेश प्रक्रियेकरीता विद्यार्थी व पालकांना आवश्यक मदतीसाठी 10 मदत केंद्र निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये वसंतराव पाटील मुले/मुलींची शाळा (आकुर्डी), कल्पना इंग्लिश मीडियम स्कूल (निगडी), जी.एस.के. इंग्लिश मीडियम स्कूल (जाधववाडी), सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल (भोसरी), किड्स पॅरेडाईज इंग्लिश मीडियम स्कूल (चऱ्होली), इन्फंट जिजस प्रायमरी स्कूल (कासारवाडी), डेलमॉन्ट इंग्लिश मीडियम स्कूल, एस.पी. स्कूल (वाकड), सेन्ट मायकेल्स ज्युनियर ऑर्किड स्कूल (पिंपळे गुरव), बी.टी.मेमोरियल स्कूल (काळेवाडी) या केंद्रांचा समावेश आहे.