दुचाकीला लाथ मारुन सराफाला खाली पाडण्यात आले. यानंतर दुचाकी, दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 6 हजाराचा ऐवज जबरदस्ती चोरण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री घोले रोडकडे जाणाऱ्या ठिकाणी घडली. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मिठुसिंग राजपुरोहित (46,रा.कसबा पेठ) हे दुचाकीवरुन घरी जात असताना, त्यांच्या जवळ दुचाकीवरुन दोन व्यक्ती आल्या. त्यांनी फिर्यादीला दुचाकीस लाथ मारुन खाली पाडले. यानंतर त्यांना दमदाटी करत त्यांची दुचाकी घेऊन पळ काढला. त्यांच्या दुचाकीत सोन्याचे दागिने आणी रोकड होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी यांचे वडारवाडीत सोन्याचे दुकान आहे. ते दुकानबंद करुन दुकानातील दागिने दुचाकीच्या डिक्कीत घेऊन कसबा पेठेतील घरी चालले होते. यावोळी हा प्रकार घडला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस.लाड करत आहेत.