शस्त्राचा धाक दाखवून लुटलं!
भाड्याने कार पाहिजे असल्याचे सांगत टुर व्यवसायीकाला दांडेकर पुलावर बोलावून घेतले. यानंतर धारदार शस्त्राचा धाक दाखवत कार, मोबाईल आणी 10 हजाराची रक्कम जबरदस्तीने लूटून नेली. याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ईस्माइल शेख(44,रा.दत्तवाडी) यांची टुरिस्ट कार आहे. त्यांना एका व्यक्तीने गुरुवारी दुपारी कार भाड्याने पाहिजे असल्याचा कॉल केला होता. त्यानूसार ते दांडेकर पुल येथे कार घेऊन गेले. तेथे कॉल करणाऱ्या व्यक्तीने त्यांना शस्त्राचा धाक दाखवत कार, मोबाईल आणी त्यांच्या जवळील रोकड असा 1 लाख 62 हजाराचा ऐवज लूटून पोबारा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपीने जस्ट डायलवरुन गाडी बुक केली होती.
आरोपी दांडकर पुल येथे गाडीत बसल्यावर त्याने फिर्यादीला पानशेत रोडवर नेले. तेथे सुनसान रस्त्यावर त्याला दमदाटीक करुन लूटून कारसह पळ काढला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक के.डी.संकपाळ करत आहेत.