मुंबई – येथील एका जहाज (shipping boat) व्यवस्थापन कंपनीच्या एका माजी अभियंत्याने कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला ब्लॅकमेलिंग (Money Blackmailing) करून तब्बल 1.97 कोटी रुपयांची खंडणी (Extortion) वसुल केली असल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे. या कंपनीच्या एका जहाजाने अमेरिकेच्या हद्दीत (America border) प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने हे ब्लॅक मेलिंग केल्याचे सांगितले जात आहे.
फर्मच्या व्यवस्थापकीय संचालकाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, संबंधीत आरोपींविरुद्ध खंडणी वसुली आणि भारतीय दंड संहितेच्या इतर तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या जहाज व्यवस्थापन कंपनीचे दक्षिण मुंबईतील चर्चगेट येथे कार्यालय असून दिल्ली आणि सिंगापूर येथे कार्यालये आहेत, असे त्यांनी सांगितले.(money fraud)
तक्रारकर्त्याने असा आरोप केला आहे की त्यांना जून 2022 मध्ये एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता, ज्यामध्ये कॉलरने मेक्सिकोहून अमेरिकेच्या दिशेने जात असताना समुद्रात प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणाऱ्या जहाजाचा यूएस कोस्ट गार्डला व्हिडिओ पाठवण्याची धमकी दिली होती. स्वतःला झारखंडचा रहिवासी म्हणून ओळख सांगणाऱ्या कॉलरने दावा केला की जहाजाने प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे. (Mumbai news)
हा व्हिडीओ लपवून ठेवायचा असेल तर पैसे द्यावे लागतील असे त्याने म्हटले होते. नंतर असे आढळून आले की हा फोन कॉल करणारा इसम फर्ममध्ये अभियंता म्हणून काम करीत होता. तक्रारदाराने भीतीपोटी कंपनीच्या सिंगापूर कार्यालयातील बॅंक खात्यातून झारखंडमधील आरोपीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. काही दिवसांनंतर, त्याला पुन्हा आरोपीचा फोन आला, त्याने यावेळी 3 लाख डॉलर्सची मागणी केली. यानंतर व्यवस्थापकीय संचालकांनी पोलिसांकडे तक्रार केली.