World Cup 2023 AUS vs AFG Live Score : अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला 292 धावांचे लक्ष्य दिले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानने 50 षटकांत 5 गडी गमावून 291 धावा केल्या. इब्राहिम झद्रानने 143 चेंडूत 129 धावा केल्या तर राशिद खानने 18 चेंडूत 35 धावांची नाबाद खेळी केली. अखेरीस इब्राहिम आणि रशीद यांच्यात सहाव्या विकेटसाठी 28 चेंडूत 58 धावांची नाबाद भागीदारी झाली. अफगाणिस्तानने शेवटच्या पाच षटकात 64 धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. रहमानउल्ला गुरबाज 25 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. यानंतर रहमत शाह आणि इब्राहिम झद्रान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. रहमत 30 धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर इब्राहिमने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. शाहिदी 26 धावा करून बाद झाला.
अजमतुल्ला उमरझाईही 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहम्मद नबी 12 धावा करू शकला. दरम्यान, इब्राहिमने वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला.
𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐏𝐎𝐒𝐓 𝟐𝟗𝟏/𝟓 𝐎𝐍 𝐓𝐇𝐄 𝐁𝐎𝐀𝐑𝐃! 🎯#AfghanAtalan, riding on @IZadran18‘s (129*) magnificent hundred and @rashidkhan_19‘s incredible 18-ball 35*-run cameo, posted 291/5 runs on the board in the 1st inning. 🤩#CWC23 | #AFGvAUS | #WarzaMaidanGata pic.twitter.com/rIiGW8dcLb
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 7, 2023
इब्राहिमने 143 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 129 धावांची खेळी केली. त्याचवेळी राशिदने 18 चेंडूत 35 धावांच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने दोन बळी घेतले. तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.