सीडनी – जगाच्या पाठीवर असलेल्या सर्व समुद्राच्या तळाशी तब्बल १ कोटी ४० लाख टन प्लास्टिकचे छोटे कण जमा झाले असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायन्स संस्थेने केलेल्या या अभ्यासाप्रमाणे आधुनिक जीवनशैलीमुळे समुद्राच्या पोटात जमा होणाऱ्या प्लास्टिकमुळे समुद्राच्या तळाशी एवढ्या प्रचंड प्रमाणात हे कण जमा झाले आहेत गेल्या वर्षीपेक्षा यामध्ये तब्बल २५ टक्के भर पडली आहे.
या संस्थेने समुद्राच्या तळातून नमुने गोळा करण्यासाठी रोबाच्या माध्यमातून चालणाऱ्या एका पाणबुडीचा वापर केला हि पाणबुडी समुद्रात ३००० मीटरखोल गेली होती समुद्राचा ताल म्हणजे एखादी प्लास्टिक साठवणारी कचरा कुंडी झाली आहे असे या पाहणीनंतर लक्षात आले समुद्रात फेकण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू कालांतराने नष्ट होतात आणि या वस्तूंचे कण समुद्राच्या पोटाशी जमा होतात असे या अभ्यासात म्हटले आहे.
फ्रंटियर्स फॉर मारिन सायन्स या नियतलकालिकात हे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले असून जगातील सर्वच देशांनी प्लॅस्टिकच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत असे आवाहन करण्यात आले आहे.