पुणे : भारतभूमीची किर्ती जगभर पसरवणारे योध्दा संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद असून त्यांचे विचार हे संपूर्ण जगासाठी देणगी असल्याच्या असल्याचे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आशा प्रतिष्ठान ,ट्रस्ट च्या वतीने तसेच पूना नाईट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रात्रशाळेतील विद्यार्थी तसेच युवकांसाठी युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. जेष्ठ शिक्षणतज्ञ प्रो.डॉ.देवानंद शिंदे सर पूना नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अविनाश ताकवले सर, आशा प्रतिष्ठान ट्रस्ट च्या अध्यक्षा अंजलीताई लोणकर या वेळी उपस्थित होत्या.
प्रा. डॉ.देवानंद शिंदे सर यांनी स्वामी विवेकानंदाचे विचार, एकविसाव्या शतकातील शिक्षण पद्धती आणि आजचा विद्यार्थी यावर व्याख्यान दिले आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात असलेल्या त्रुटी व त्यावर आपण कशी मात करावी हे स्वामी विवेकानंदाच्या विचारांच्या आधारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक चंदन डाबी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम डांगी व आभार प्रदर्शन प्रतिक डांगी यांनी केले.