बिल्डरला खोट्या गुन्ह्यात अडकाविण्याची धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणात अटकपूर्व

पुणे – शहरातील प्रसिध्द बिल्डरला बलात्काराच्या खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी व काही कोटी रुपयांची जागा नावावर करुण देण्याची मागणी केल्याप्रकरणात एकाला अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीसश ए.एन.मरे यांनी मंजुर केला आहे.

गुजुल्ला श्रीनावासुलू असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ऍड. घुगे यांना ऍड. सायली कणसे आणि ऍड. सचिन जगताप यांनी मदत केली. त्याचे नाव एफआयआरमध्ये नसून, पोलिसांकडून त्याला समज बजावला आहे.

त्याचा या घटना आणि गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. त्याला अडकाविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन देण्याची मागणी ऍड. श्रीकृष्ण घुगे यांनी केली. या प्रकरणात निलंबीत पोलीस कर्मचारी शौलेश हरिभाऊ जगताप (रा.भवानी पेठ),

स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन (रा.प्रियदर्शन सोसायटी सिंहगड रस्ता), माहिती अधिकार कार्यकर्तो रविंद्र लक्ष्मण बराटे (रा.लूल्लानगर, कोंढवा), अमोल सतिश चव्हाण(चव्हाणवाडा, कोथरुड) यांच्यावरही खंडणीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल आहेत.

या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली होती. याबाबत बांधकाम व्यावसायिक सुधीर वसंत कर्नाटकी(64,रा.राजगड, पौड) यांनी फिर्याद दिली आहे. जुलै 2020 मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात गुजुल्ला याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.