भोर – भोर तालुक्यातील आंबवडे खोऱ्यातील तीन तरुण संचारबंदी असताना व तोंडाला मास्क न लावता विनाकारण चारचाकी वाहनात (एमएच 43 एटी 8503) बसून फिरताना आढळले. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती भोर पोलिसांनी दिली. लहू गोविंद तुपे (वय 31, रा. कारी, ता. भोर), संतोष गोपाळ तुपे (वय 31) व सूरज बाबुराव पेटकर (वय 29, दोघेही रा. कारी) अशी या तिघांची नावे आहेत.