ग्रामपंचायत वाघोलीचा उपक्रम : महिला सक्षमीकरणासाठी पाऊल
वाघोली : महिला सक्षमीकरणासाठी वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने वाघोलीतील महिलांना वाहन चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज प्रा. लि. ट्रेनिंग स्कूलच्या मदतीने महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आत्तापर्यंत ट्रेनिंग स्कूल तर्फे 150 महिलांना पुर्णपणे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जवळपास 250 महिलांनी नाव नोंदणी केलेली आहे. ट्रेनिंग स्कूल तर्फे महिलांना पशिक्षण देत असतांना ऑडीओ- व्हीडीओ द्वारे, प्रत्यक्ष रोडवर प्रॅक्टिकल, टेक्निकल ट्रेनिंग, यामध्ये रोड सेफ्टीचे प्रशिक्षण व संकटकाळी व अपघात समयी घेण्यात येणाऱ्या काळजीचेही शिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येते. या योजनेचा लाभ वाघोलीतील महिला घेत आहेत. इतर महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी केले आहे.