प्रशासकीय अधिकाऱ्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी पेन ड्राईव्हचा शोध सुरू
नवी दिल्ली/ बंगळूरु : सीबीआयने बंगळुरूचे माजी पोलिस आयुक्त आलोक कुमार यांच्या निवासस्थानाची गुरुवारी तपासणी केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एच डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस-जद (एस) सरकारच्या कारकिर्दीत राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंगप्रकरणी ही तपासणी केली गेली. सीबीआयचे पथक एक पेन ड्राईव्ह शोधत होते, बोलले जात आहे. तब्बल 300 हून अधिक लोकांच्या फोनवरील संभाषणाचा तपशील या पेन ड्राईव्हमध्ये असल्याचा आरोप जेडीए (एस) च्या असंतुष्ट आमदारांनी केला आहे. हा पेन ड्राईव्ह शोधण्यात पथकाला यश आले की नाही हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नाही. आलोक कुमार हे सध्या राज्य राखीव पोलिस दलाचे अतिरिक्त महासंचालक आहेत.
टॅपिंग खरोखर घडली का आणि कोणाच्या आदेशानुसार घडली, याबाबत कुमार यांची चौकशी केली असल्याचे सीबीआयने सांगितले. संशयितांच्या चौकशीदरम्यान सीबीआयला कळले की पोलिसांच्या मुख्य सर्व्हरवरून संभाषणाच्या तपशीलाची प्रत डाउनलोड केली गेली होती आणि पेन ड्राईव्हमध्ये बेंगळुरू पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिला गेला होता. असा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे.
आपल्याला काळजी करण्याची काही कारण नाही कारण या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही, असे कुमारस्वामी म्हणाले. त्यांना पाहिजे त्यांच्यावर छापा घालू द्या. तुम्ही मला का विचारता? मी त्यात कसा जोडला आहे? असे ते म्हणाले.