न्युयॉर्क : पाकिस्तान सारख्या देशाचे पंतप्रधानपद सांभाळणे ही साधी गोष्ट नाही. एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण प्रचंड तणावाखाली असल्याचे सांगितले. इतक नव्हे तर माझ्या ठिकाणी अन्य कोणी असते तर त्याला हार्ट अटॅक आला असता, असे इम्रान म्हणाले.
सध्या संयुक्त राष्ट्र महासंघाच्या महासभेसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आलेल्या खान यांनी काऊंसिल ऑफर फॉरेन रिलेशन्स अफेयर्स येथील कार्यक्रमता पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्वत: किती तणावाखाली आहोत हे सांगितले. पाकिस्तानमध्ये इतक्या अडचणी सुरु आहेत त्यामुळे मी सतत काळजीत असतो. सध्या एका बाजूला अफगाणिस्तानमध्ये अडचणी आहेत. इराणमध्ये काही प्रश्न आहेत. चीन देखील आमच्यावर रागावला आहे आणि आता तर भारतासोबत देखील तणावाची परिस्थीती आहे. जर माझ्या ठिकाणी तुम्ही असता तर नक्कीच हार्ट अटॅक आला असता, असे खान म्हणाले. सध्या असलेल्या पाकिस्तानमधील अडचणींचा सामना करण्यासाठी मी जोरदार प्रयत्न करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
माझ्याकडे अधिकार नाहीत…
कार्यक्रमता बोलताना इम्रान खान यांनी त्यांची हतबलता देखील व्यक्त केली. अनेक समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडे अधिकारच नाहीत. जसे अधिकार चीनमधील सत्ताधाऱ्यांकडे आहेत तसेच अधिकार माझ्याकडे नसल्याचे खान यांनी सांगितले. चीनमधील सत्ताधाऱ्यांप्रमाणे माझ्याकडे अधिकार असते तर पाकिस्तानमधील भ्रष्ट्राचार संपेल आणि देश प्रगतीपथावर येईल. या कार्यक्रमात बोलताना इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नावर अन्य देशांना मध्यस्थी करण्याची मागणी केली. दोन्ही देशांकडे अणू बॉम्ब आहेत. जर या दोन देशात काही झाले तर त्याचा परिणाण संपूर्ण दक्षिण आशियावर होईल.
सध्याचा असलेला तणाव हाताळण्याची ताकद क्रिकेट खेळल्यामुळे मिळते. क्रिकेट खेळत असताना आलेल्या अडचणी आणि तेव्हा घेतलेल्या मेहनतीमुळे मी सध्या ठिक आहे