सातारा, दि. 7 (प्रतिनिधी)
करंजे, ता. सातारा येथे एका दुकानाच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून 36 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
सुनिल दगडू पवार, इराक उस्मान इनामदार, प्रवीण सुभाष देवकर, अकबर हनिफ बागवान, विलास तानाजी पवार, अस्लम हनिफ शेख, सर्जेराव दळवी, इरफान अस्लम सय्यद,राहूल दादासाहेब शिर्के (सर्व रा. एकता कॉलनी करंजे) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी,एकता कॉलनी (करंजे) येथील एका गाळ्याच्या आडोशाला जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती.
त्यानंतर कर्मचाऱ्यांनी स्वत: त्याठिकाणी छापा टाकत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 36 हजारांचा ऐवज जप्त केला. संयितांना अटक करून शाहूपुरी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावत सोडून दिले.