इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भारतात पूर्वेकडील लोक चीनसारखे दिसतात आणि दक्षिणेकडील लोक आफ्रिकेसारखे दिसतात. असे पित्रोदा यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
सॅम पित्रोदा म्हणाले, ‘भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. येथे पूर्वेकडील लोक चीनसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक बहुधा गोऱ्यासारखे दिसतात आणि दक्षिणेकडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात.
त्यांच्या या विधानावर भाजपने टीका केली आहे. सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर भाजप खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले, सॅम पित्रोदा भारतासाठी काय विचार करतात हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. ते अपयशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते राहुल गांधींचे सल्लागार आहे. राहुल गांधी का अर्थहीन बोलतात हे मला आता समजले आहे. ही पराभवाची निराशा आहे. त्यांना ना भारत कळतो ना त्याचा वारसा. असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
या प्रकरणी कंगना राणावतनेही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कंगनाने ट्विट करत म्हटले आहे की, ‘सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे गुरू आहेत. त्यांचे भारताविषयीचे विभाजनवादी आणि वर्णद्वेषी विधान ऐका. त्यांची संपूर्ण विचारधारा फूट पाडा आणि राज्य करा यावर आधारित आहे. भारतीयांना चिनी आणि आफ्रिकन म्हणणे घृणास्पद आहे. काँग्रेसला लाज वाटली पाहिजे.’ असं म्हणत टीका केली आहे.