कोल्हापूर – मुलाच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा भरवून त्यामध्ये चिअरगर्ल नाचवणे कोल्हापूरातील संयोजकांना चांगलेच महागात पडले आहे. या संदर्भातील शासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संयोजक रघुनाथ पाटील यांच्यावर राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 'चीअर गर्ल्स'चा धिंगाणा
चिअर्स गर्ल शिवारात आणून तरुण गाण्यावर थिरकले
राधानगरीच्या पाटीलवाडीतील घटना
विनापरवाना क्रिकेट स्पर्धेचं आयोजन
पोलिसांच्या भितीने आयोजकानं धूम ठोकली@JaiMaharashtraN @KOLHAPUR_POLICE pic.twitter.com/aMIwwZYzrY
— Amrut Bharmu Sutar (@amarsutar9) December 11, 2020
रघुनाथ पाटील यांनी मुलगा भैरवनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त गावात क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. दोन दिवसापासून या स्पर्धा सुरू असून यामध्ये आणून त्यांना नाचवल्या जात होत्या. चिअर्स गर्ल्ससोबत तरुण बेधुंदपणे थिरकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
शासनाच्या कोणत्याही सूचनांचे पालन केलेले नव्हते. याबाबतचा व्हिडिओ जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात पोहोचला. त्यांच्या आदेशानुसार व्हिडीओमधील सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस येण्याच्या भीतीने आयोजकांनी स्पर्धा रद्द करून धूम ठोकली. मात्र, तरुणांनी घातलेल्या धिंगाण्याची कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.