लाहोर : लष्कर प्रमुख जनरल जावेद बाजवा यांना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख पादावर सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वागत केले आहे. मात्र बाह्य शत्रू आणि देशातर्गत माफियांचा विचार करता या निर्णयाने देशाच्या शत्रूंची निराशा केली असे त्यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांच्या विश्वासातील जन. बाजवा गुरूवारी निवृत्त होणार होते. त्यांना इम्रान खान सरकारने तीन वर्षाची मुदतवाढ दिली. मात्र त्या विरोधात सर्वोच्च न्यायलयात आव्हान देण्यात आले. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायलयाच्या तीन न्यायाधिशांच्या खंडपीठाने त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मान्य केली.
संस्थात्मक संघर्षातून देशाला अस्थिरतेत ढकलू पाहणाऱ्यांची या निर्णयाने निराशा केली. यामुळे आमचे बाह्य शत्रू आणि देशांतर्गत माफिया यांची खूप निराशा झाली असेल असे त्यांनी ट्विट केली आहे. पाकिस्तानचे बाह्य शत्रू आणि अंतर्गत माफियांच्यात त्यांनी फरक केला नाही. या माफियांना देशाची लूट करून परदेशांत मालमत्ता न्यायची होती त्यांना बावजा यांची धडकी भरत असे त्यांनी म्हटले आहे.