पुणे ,दि.28-
कात्रज घाटात वाहनचालकांना अडवून लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला भारती विद्याापीठ पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून दुचाकी तसेच तीक्ष्ण शस्त्रे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
करण सुरेश शिंदे (वय २३), मितेश सुरेश शिंदे (वय २९), अमित सुनिल भोरडे (वय २५, तिघे रा. कात्रज), शंभू जालिंदर कोंडे (वय २१), विशाल मोहन बोराने (वय २५, दोघे रा. वरवे, ता. भोर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मध्यरात्री कात्रज घाटात भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी कुंदन शिंदे आणि हवालदार कृष्णा बढे गस्त घालत होते. त्यावेळी घाटातून येणाºया वाहनचालकांना अडवून त्यांना लुटण्याच्या तयारीत चोरटे असल्याची माहिती शिंदे आणि बढे यांना मिळाली. तपास पथकातील पोलिसांनी या भागात सापळा लावला. त्यावेळी कात्रज घाटातील झुडपांमध्ये आडोशाला शिंदे, भोरडे, कोंडे आणि बोराने थांबले होते. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे तीन कोयते आढळून आले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा वाहनचालकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना त्यांनी दिली.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली. चौकशीत आंबेगाव पठार भागात दहिहंडीच्या दिवशी एका युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून आरोपी पसार झाल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे, उपनिरीक्षक सुबराव लाड, सर्फराज देशमुख, सचिन पवार, राहुल तांबे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, महेश मंडलिक, अभिजीत जाधव, योगेश सुळ यांनी ही कारवाई केली.
—