सातारा -आनेवाडी (ता. जावळी) येथे खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते मंगळवार, दि. 5 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुणवंतांचा गुणगौरव, शिष्यवृत्ती वाटप व व्याख्यान होणार आहे. आनेवाडी येथील सर्व मंडळे, विविध सामाजिक संस्थांतर्फे दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार, शिष्यवृत्ती वाटप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास अमोल कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देशभक्त स्वामी अण्णा प्रतिष्ठान व विविध मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी केले आहे.