कराड -येथील कृष्णा हॉस्पिटलमधून करोनामुक्त झालेल्या सात जणांना गुरूवारी डिस्चार्ज देण्यात आला. करोनामुक्त झालेल्या नागरिकांमध्ये पाचजण कराड तालुक्यातील तर दोन जण पाटण तालुक्यातील आहेत.
या करोनामुक्तांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. विनायक राजे, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, संध्या जगदाळे, कविता कापूरकर यांच्यासह हॉस्पिटलचे वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.