सातारा – जिल्ह्यातील करोनाचा उद्रेक सुरूच असून बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार 67 जण करोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1492 वर पोहचली आहे. बुधावरी रात्री आलेल्या अहवालाचा तपशील प्रशासनाने गुरूवारी सकाळी दिला. त्यानुसार सातार तालुक्यातील जिहे आणि खंडाळा तालुक्तील शिरवळ ही दोन गावे करोनाची हॉटस्पॉट बनत चालली आहेत.
सातारा शहर व परिसराचाही धोका वाढला आहे. कराड तालुक्यातही कोरनाचा विळखा कायम असून या अहावालात वाई, खंडाळा, खटाव, कोरेगाव तालुक्यातील रुग्णांचाही समावेश आहे.
आरोग्य विभागाकडून बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये येथे उपचार घेत असलेल्यांमधील निकट सहवासातील 59, प्रवास करुन आलेले 4, सारीचे 4 अशा एकूण 67 नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या 67 बाधित रुग्णाचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. कराड तालुक्यातील बनवडी येथील 35, 43 वर्षीय पुरुष, 32 वर्षाची महिला, 13 वर्षाची युवती, 14 वर्षाचा युवक, 7 वर्षाचा बालक व 11 वर्षाची मुलगी, मलकापूर येथील 51 वर्षाचा पुरुष, वाई तालुक्यातील पसरणी येथील 70 वर्षाची महिला व 4 वर्षाचा बालक, वाईतील ब्राम्हणशाहीमधील 58 वर्षाचा पुरुष, बदेवाडी येथील 20 वर्षीय युवक, शिरगाव येथील 90 वर्षाचा पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पवारआळीतील 37 वर्षाचा पुरुष, शिवाजी कॉलनीतील 46 वर्षाचा पुरुष, तारांगण पळशी रोड येथील 39 वर्षाची महिला, शिर्के कॉलनीतील 28 व 50 वर्षाचा पुरुष, खोलारे आळीतील 9 वर्षाचा बालक, शिरवळ येथील 57 वर्षीय पुरुष, न्यू कॉलनीतील 37 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 45 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 1, न्यू कॉलनीतील 59 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 36 वर्षीय पुरुष व
30 वर्षीय महिला, पाडेगाव, लोणंद येथील 52 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, चोपनवस्ती, लोणंद येथील 6 वर्षाची बालिका, खेड येथील 25 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील रविवार पेठेतील 33 वर्षाचा पुरुष, 33 वर्षाची महिला, 50 व 41 वर्षाची महिला, 26 वर्षाचा पुरुष व 2 वर्षाचा बालक, धावली येथील 19 वर्षाची युवती, सैदापूर येथील 49 वर्षाची महिला, चोरगेवाडी येथील 21 वर्षाचा पुरुष, संगमनगर येथील 40 वर्षाची महिला, जिहे येथील 38, 60, 86, 71, 70, 23 वर्षाची महिला, 75, 55, 25, 40, 38, 27 वर्षीय पुरुष, 42 वर्षाची महिला, 40 व 58 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय महिला,
सातारा शहरातील व्यंकटपूरा पेठेतील 64 वर्षाची महिला, शहरातील मल्हारपेठेतील 35 वर्षीय महिला, भरतगाववाडी येथील 28 वर्षाचा पुरुष, खटाव तालुक्यातील मालनवाडा वडूज येथील 70 वर्षीय पुरुष, निमसोड येथील 70 वर्षाचा पुरुष, पाटण तालुक्यातील कासनी येथील 50 वर्षाची महिला, कोरेगाव तालुक्यातील एकसळ येथील 66 वर्षीय पुरुष, चिलेवाडी भाडळे येथील 1, साप येथील 1, वाठार किरोली येथील 1 अशा एकूण 67 जणांचा समावेश आहे.
जिहे गावात स्त्रावाचे नमुने घेणार
सातारा तालुक्यातील जिहे गाव करोनाचा हॉटस्पॉट बनत चालला असून तेथील संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. उद्यापासून (शुक्रवार) आरोग्य विभागाचे पथक गावात जाऊन लोकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली. त्यामुळे संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.
जिहे गावात स्त्रावाचे नमुने घेणार
सातारा तालुक्यातील जिहे गाव करोनाचा हॉटस्पॉट बनत चालला असून तेथील संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. उद्यापासून (शुक्रवार) आरोग्य विभागाचे पथक गावात जाऊन लोकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली. त्यामुळे संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.