सातारा -जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 48 नागरिकांना दहा दिवसांनतर गुरूवारी घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या करोनामुक्तांमध्ये जावळी तालुक्यातील आखेगणी येथील 65 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 40 वर्षीय महिला, बिरामणेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, बामणोली येथील 46 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील 57, 42, 48, 43, 55 वर्षीय महिला व 48वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, न्यू कॉलनीतील 60 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन येथील 32 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील उरुल येथील 30 वर्षीय पुरुष, बोडरी येथील 34 वर्षीय पुरुष, सांगवड येथील 31 वर्षीय पुरुष, फलटणमधील रविवार पेठेतील 68, 25, 62, 60 वर्षीय महिला, जिंती येथील 44 वर्षीय महिला, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष, आंदरुड येथील 35 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 22, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 71, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 57, फलटण ग्रामीण रुग्णालयातील 20, कोरेगाव 27, वाई 40, शिरवळ 92, रायगाव 23, पानमळेवाडी 42, मायणी 9, महाबळेश्वर 13, पाटण 79, खावली येथील 28 अशा एकूण 523 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याच्या एनसीसीएस व कृष्णा मेडिकल कॉलेजकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. करंजखोप येथील 8 वर्षाची बालिका, जांभ खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष व दुर्गळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष.
75 वर्षीय महिला, तारुख येथील 22, 54, 32, 35 वर्षीय महिला, 11 वर्षाचा बालक, 40 वर्षीय पुरुष, काळेवाडी येथील 8 वर्षाचा बालक, तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष, कराड येथील 46 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 47 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, मलकापूर येथील 1 पुरुष, येळगाव येथील 65 वर्षीय पुरुष, हिंगणोली येथील 54 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील धर्मपुरी येथील 35 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील
सकाळी 9 ते 2 या वेळेतच मार्केट व दुकाने सुरु राहणार
जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 9 जुलैच्या सायंकाळी 5 ते दि. 31 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्येच सुरु राहतील, असे आदेश काढले आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये संबंधित प्रांताधिकाऱ्यांचे आदेश लागू राहणार आहेत. सातारा जिल्ह्यात लग्नविधीसारख्या कार्यक्रमास जास्तीत जास्त 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्याबाहेरील वधू, वर, वधु- वरांचे आई-वडील, सख्खे भाऊ-बहिण, सख्खे आजी-आजोबा यांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही शेखर सिंह यांनी आदेशात म्हटले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेची दुकाने मुळ 144 च्या आदेशात नमूद वेळेप्रमाणे सुरु राहणार आहेत.