- देशात एक हजार ः केअर ऑफ पब्लिक सेफ्टी संस्थेचा आरोप
पिंपरी – देशातील एका हजार विद्यापीठे बोगस असून ती राजरोसपणे सुरू आहेत. तर पिंपरी-चिंचवड शहरातही सहा बोगस विद्यपीठ कार्यरत आहेत. मात्र त्यावर शासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याचा आरोपी केअर ऑफ पब्लिक सेप्फी (कॉप्स) संस्थेचे डॉ. अभिषेक हरिदास यांनी बुधवारी (दि. 5) पत्रकार परिषदेत केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदम बेग, प्रदीप माने, राहुल विटकर, धनराज चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. हरिदास म्हणाले, यूजीसीकडे या विद्यापीठाची नोंदणी नसल्याने संस्था बोगस ठरतात. तसेच त्यांनी दिलेल्या पदव्यादेखील बोगस आहेत. अशा संस्थांवर सरकारने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. मात्र यापैकी काही संस्था या राजकीय पुढाऱ्यांच्या असल्याने कारवाई होत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा
गेल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड शहरातील एका बोगस शिक्षण संस्था आणि विद्यापीठाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी चिंचवड शहरात अशी सहा बोगस विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कॉप्स संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 13 बोगस विद्यापीठांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र संस्थेच्या कामाला मर्यादा आहे. बोगस विद्यापीठांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र या संस्थांच्या बचावासाठी शासनाने कायद्यात बदल केल्याचा आरोपही डॉ. हरिदास यांनी केला आहे.