पिंपरी – सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड करून व्हायरल केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील एक महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात एकूण पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे 2019 रोजी वाकड येथे ही घटना घडली.
इमनूर बीसवा या यूजर आयडीच्या 7498721058 या मोबाईल धारकाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत. यापूर्वी हिंजवडी, चिंचवड आणि सांगवी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 3) बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी सांगवी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.