हिना खान- विकास गुप्ताच्या मैत्रीत प्रियांकामुळे अंतर

“बिग बॉस 11’मधील स्पर्धक विकास गुप्ताचे काही दिवसांपूर्वी प्रियांका शर्माबरोबर भांडण झाले होते. आता त्याचे हिना खानबरोबर भांडण झाल्याचे समजते आहे. दोघेही सध्या एकमेकांशी बोलत नाही आहेत. “आयपीएल’मधील क्रिकेटच्या एका सामन्यादरम्यान दोघांमधील बेबनाव उघड झाला होता. हे दोघेही मॅचदरम्यान एकमेकांशी अजिबात बोलत नव्हते, हे तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच लक्षात आले होते. त्यांनी एकमेकांना “हाय’पण केले नव्हते. दोघेही एकमेकांसमोर आले पण ते काहीच न बोलता निघून गेले. त्यांच्यातील या भांडणाला प्रियांका शर्माच कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

हिना खान आणि प्रियांका शर्मा या दोघी तर एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. “बिग बॉस 11’मध्ये हिना आणि विकास सारखे भांडत होते. मात्र तो रिऍलिटी शो संपत असतानाच दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. दुसरीकडे हिना खान आणि प्रियांका शर्मा यांचे लव्ह त्यागी बरोबर देखील बिनसले आहे, असे समजते आहे. लव्ह त्यागीने हिनाला अनफॉलो केले आहे. हिना-प्रियांका आणि विकास यांच्यातले नातेसंबंध खूपच नाजूक बनले आहेत. आता यांच्यातले कोण पॅचअप करायला पुढे येते, बघूया.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.