वैष्णवांच्या स्वागतासाठी बारामतीकर सज्ज

प्रशासनाची जय्यत तयारी : तुकोबांची पालखी आज बारामती मुक्‍कामी

जळोची – जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याने सोमवारी (दि. 1) बारामती तालुक्‍यात प्रवेश केला असून मंगळवारी (दि. 2) पालखी सोहळा बारामती शहरात मुक्‍कासाठी असणार आहे. यासाठी बारामती नगरपालिका प्रशासन सज्ज झाली असून वारकऱ्यांना कोणतीही अडचण होणारा नाही यापद्धातीने प्रत्येक विभागाने तयारी केली असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले.

शहरात रस्त्यांच्या साईडपट्ट्यावरील गवत काढून स्वच्छ करण्यात आले आहे. शहरातील हॉटेल, हातगाडेधारकांना स्वच्छता, पिण्याच्या पाण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या. तसेच पालखी मुक्‍कामी (शारदा प्रांगण) येथील मैदान स्वच्छ व खड्डे बुजवण्यात आले आहे. परिसरात धूर फरवारणी करण्यात सुरुवात केली आहे. शहरातील 48 सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छ करण्यात असून हॉटेल, मंगल कार्यालये, पेट्रोल पंप, शाळा अशा सार्वजनिक ठिकाणची स्वच्छतागृहे वारकऱ्यांना खुले करण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सोहळ्यात सहभागी असलेल्या दिंड्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज असल्याचे मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी सांगितले. पालख्यांचा मुक्‍काम असणाऱ्या ठिकाणची पूणच स्वच्छता करण्यात आली आहे.

तुकोबांच्या पालखीच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. सभामंडप उभारण्यात आला आहे. आरोग्य व पिण्याच्या पाण्याबाबत योग्य नियोजन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
– सुभाष नारखेडे, आरोग्य विभाग अधिकारी, बारामती नगरपालिका

Leave A Reply

Your email address will not be published.