फार्मसी क्षेत्र उज्वल करिअरचा …एक राजमार्ग

देशांतर्गत शिक्षण पध्दतीमध्ये उज्वल करिअरच्या विविध दिशा उपलब्ध आहेत. स्पर्धाच्या युगात शिक्षण क्षेत्रात ही मोठी स्पर्धा आहे. बदलते शैक्षणिक धोरण व त्यापुढील आव्हाने पाहाता घेतलेले ज्ञान व शिक्षण हे भविष्यातील जीवन प्रवासासाठी उपयुक्त ठरले पाहिजे असा नवा दुष्टीकोन ठेवून आजची नवी पिढी शिक्षणाची दिशा शोधत आहे. काळनुसार बदलणारे शिक्षण व बदलत्या करिअरच्या संधीचा शोध घेण्यासाठी आजची तरुणाई अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. सद्या औषध निर्माणशास्त्र शाखेकडे (फार्मसी) कल विद्यार्थ्याचा वाढला आहे यामध्ये असणाऱ्या उज्वल करिअरची संधी असल्याचे दिसून येत आहे याविषयी गौरीशंकर संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर याचा विशेष लेख……

मानवी जीवनाच्या आरोग्याविषयी निगडीत असणारे औषध निर्माण शास्त्र फार्मसी अभ्यासक्रम काळानुसार मोठे बदल होत आहे. मानवी शरिरातील विविध आजार व त्यावर प्रभावी उपचार पध्दती लागू बरोबरच वेगवेगळया चाचण्याच्या आधारे औषधांचे डोस देवून मानवी जीवनातील आजार दूर करण्यासाठी औषधनिर्माण शास्त्र उपयुक्त ठरत आहे. सद्या औषध निर्माण शास्त्र क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. आधुनिकतेनुसार या क्षेत्रात ही मोठे बदल झाले आहेत. नविण्यपूर्ण औषध निर्मिती व संशोधन तंत्र अधिक विकसित होत असल्याने बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या आजारावरती प्रभावी औषधे सहज उपलब्ध होत आहेत. अर्थात यासाठी शिक्षण देणाऱ्या संस्थाचा मोठा यामध्ये सहभाग आहे.

जागतिक स्तरावर औषध निर्माण शास्त्रमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत असून अनेक असाध्य रोगवर मात करण्यासाठी औषध निर्मितीचे संशोधन सुरु आहे यासाठी आवश्‍यक लागणाऱ्या कुशल मनुष्य बळाची मोठी मागणी वाढली आहे हे क्षेत्र अधिक गतीमानतेने विकसित होत असल्याने या क्षेत्रात नोकरी व्यवसाय उद्योग क्षेत्राला भरभराटीचे दिवस आले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील ज्ञान घेण्यासाठी विद्यार्थ्याचा कल औषध निर्माण शाखेकडे वाढला आहे. उज्वल करिअरच्या दुष्टीने या क्षेत्रात करिअरच्या विविध संधी लाभत आहे. भरघोस पगारच्या नोकऱ्या तसेच राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावर नांमवंत कंपनीत काम करण्याची संधी या शाखेत सामविलेले असल्याने मागील पाच वर्षापासून देशातील सर्व औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्रवेश पूर्ण क्षमतेने भरत आहेत.

जीवनाला स्थिरता प्राप्त करुन देणारे क्षेत्र अधिक व्यापक होत आहे. देशा अंतर्गत स्थिती पाहाता दरवर्षी डिप्लोमा स्तरावरील (फार्मसी) चे जवळपास 20 हजार विद्यार्थी ज्ञान घेवून बाहेर पडतात तर जवळपास 30 हजार विद्यार्थी डिग्री फार्मसी (बी. फार्मसी) चे विद्यार्थी बाहेर पडतात त्याचप्रमाणे एम. फार्मचे ज्ञान घेवून जवळपास 6 हजार विद्यार्थी बाहेर पडतात. या क्षेत्रातील पी. एचडी पदवी धारकाची संख्या 700 च्या घरात असल्याचे दिसून येत आहे. या सर्व घटकांचा आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान ही होत असल्याने मानवी जीवनाचे आयुष्यमान उंचावले आहे.

-श्रीरंग काटेकर, जनसंपर्क अधिकारी ,गौरीशंकर नॉलेज सिटी, सातारा

Leave A Reply

Your email address will not be published.