मावळात शेळके पर्व!

– राज्यमंत्री बाळा भेगडे डेंजर झोनमध्ये

पिंपरी – मावळ विधानसभा मतदार संघात भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे डेंजर झोनमध्ये सापडले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. शेळके यांच्या समर्थकांनी आत्तापासूनच जल्लोषाला सुरुवात केली आहे.

मावळमध्ये चुरशीची लढत होत आहे. राज्यमंत्री भेगडे यांना सुनील शेळके यांनी आव्हान दिले आहे. भेगडे व शेळके हे दोघेही पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते आहेत. परंतु, विधानसभा निवडणुकीत उमेदवारीत डावलल्याने शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

आयत्यावेळी पक्ष बदल करीत त्यांनी भेगडे यांना जोरदार टक्कर दिल्याचे पहायला मिळत आहे. मावळात शेळके पर्वाला सुरुवात झाल्याचे संकेत असून सातव्या फेरीअखेर शेळके यांनी तब्बल 27 हजार 77 मतांनी आघाडी घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.